बनावट संकेतस्थळाद्वारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न!
मुंबई, ता. २० : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेणारे ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे महत्त्वाकांक्षी संकेतस्थळाची घोषणा केली; मात्र काही अज्ञातांनी या नावाचे बनावट संकेतस्थळ तयार करून लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून अशा समाजकंटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. जेव्हा एखादा चांगला उपक्रम महाराष्ट्राच्या हितासाठी राबवला जातो, तेव्हा काही लोक त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात; मात्र अशा विघ्नसंतोषींना सोडले जाणार नाही. आयटी सेल आणि सायबर पोलिसांच्या माध्यमातून या बनावट संकेतस्थळाचा शोध घेतला जात असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक न करता केवळ अधिकृत पोर्टललाच भेट द्यावी, असे आवाहनही मनसेकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.