

RUTURAJ GAIKWAD’S FUNNY VIRAL MOMENT
esakal
RUTURAJ GAIKWAD’S FUNNY VIRAL MOMENT: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL) चा हंगाम सुरू आहे. आयपीएल सुरू झाला की अनेक नवीन नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात चेन्नई सुपर किंग्सचा(CSK) कर्णधार ऋतुराज गायकवाड(Ruturaj Gaikwad) दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ऋतुराजची एक विनोदी बाजू देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एका चिमुकलीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ऋतुराजने आपली विनोदी बाजू दाखवली.