सलाम बॉम्बे फाउंडेशन उद्योजकांसाठी डॉल्फिन टँकी
मुंबई, ता. २२ : सलाम बॉम्बे फाउंडेशनने एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या सहकार्याने त्यांच्या प्रमुख उद्योजकता मंच ‘डॉल्फिन टँकी’ची पाचवी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. यावर्षी ३६ तरुण उद्योजकांनी एकूण १२ लाख रुपयांच्या निधीसाठी आपले प्रकल्प सादर केले.
मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या तरुण उद्योजकांना तयार करण्यासाठी आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करण्यासाठी, हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. येथील सहभागींना महत्त्वाचे अनुभव आणि मार्गदर्शन मिळते. आजपर्यंत पाच आवृत्त्यांमधून ‘डॉल्फिन टँकी’ने ७०० पेक्षा जास्त उद्योजकांना पाठबळ दिले आहे. त्यापैकी १०० हून अधिक जणांना थेट लाभ झाला असून, ७० टक्के महिला उद्योजकांचा यात सहभाग आहे. मागील विजेत्यांच्या मासिक उत्पन्नात बीजभांडवल, मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोड मिळाल्यानंतर सरासरी अडीच ते तीन पट वाढ झाली होती.
या कार्यक्रमात ब्युटी अँड वेलनेस, मोबाईल रिपेअरिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनिंग अशा विविध क्षेत्रांतील व्यवसाय कल्पना सादर करण्यात आल्या. यामध्ये सुवर्ण (५० हजार रुपये), चांदी (३० हजार रुपये) आणि कांस्य (२०,००० रु.) या स्वरूपात सहाय्य देण्यात आले. हे अंतिम स्पर्धक १५० हून अधिक उद्योजकांमधून निवडले गेले. एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे एमबीए विद्यार्थी ‘वी केअर-सिविक एंगेजमेंट इंटर्नशिप’द्वारे मार्गदर्शन करतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि व्यावसायिक कौशल्यांचा संगम घडतो. ‘डॉल्फिन टँकी’सारखे उपक्रम तरुणांना नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी निर्माण करणारे बनवण्यावर भर देतात, असे सलाम बॉम्बे फाउंडेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरव अरोरा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.