मुंबई

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित

CD

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित

मुंबई, ता. २० : डोंबिवली रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी (ता. २०) संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळित झाली. अप आणि डाऊन धीम्या तसेच जलद मार्गावरील गाड्या उशिराने धावू लागल्याने कामावरून घरी निघालेल्या हजारो प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली स्थानकातील सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाला. त्यामुळे ठाणे ते कल्याणदरम्यान लोकल वाहतूक काही काळ ठप्प झाली. अनेक गाड्या मार्गातच थांबल्याने प्रवासी डब्यांमध्येच अडकून पडले, तर फलाटांवर प्रचंड गर्दी उसळली. या बिघाडाची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बिघाड दुरुस्त करण्यासाठी जवळपास तासभर लागल्याने प्रवाशांचा संताप वाढला. अखेर रात्री ८.५८ वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकारामुळे मेन लाइनवरील अप आणि डाऊन धीम्या तसेच जलद लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले. कल्याण, कसारा आणि कर्जत दिशेने जाणाऱ्या गाड्यांनाही त्याचा फटका बसला. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांना जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागला. दरम्यान, या गोंधळाचा परिणाम रात्री उशिरापर्यंत जाणवत होता. आधीच विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारण काय सांगितलं?

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT