मुंबई

नागपूरच्या संघ मुख्यालयावर काँग्रेस, ‘वंचित’चा सोमवारी मोर्चा

CD

नागपूरच्या संघ मुख्यालयावर काँग्रेस, ‘वंचित’चा सोमवारी मोर्चा
एपस्टीन फाईल प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः ‘‘एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम का ठेवले, याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी (ता. २३) काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे,’’ असे काँग्रेसने कळवले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हजारो पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार आहेत. ‘‘अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईलची जी माहिती जाहीर केली आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री हरदीप पुरी यांचेही अनेक वेळा एपस्टीन फाईलमध्ये नाव आलेले आहे. अमेरिकेशी केलेल्या व्यापारी करारानेही भारतातील शेतकरी व शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भारताने अमेरिकेशी तडजोड केली असून नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व व स्वाभिमान गहाण ठेवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एपस्टीन फाईलच्या निमित्ताने नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे चाल, चलन, चेहरा व चारित्र्य उघड झाले आहे. रा. स्व. संघ ही भाजपची मातृसंस्था असून भाजपसाठी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय भाग घेत असते. भारताची जगात नाचक्की होत असताना रा. स्व. संघाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर अद्याप का ठेवले आहे, याचा जाब विचारण्यासाठी हा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आला आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

'स्वामी समर्थ'मध्ये सुरू होणार 'महानिर्वाणाचा अध्याय; हे अभिनेते साकारणार प्रौढ स्वामींची भूमिका

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेतली

Urali Kanchan News : एमआयटी एडीटी–रायन सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान शिक्षणाची नवी दिशा

Akola News : अकोल्यात गॅस संकट तीव्र! १० दिवसांपासून सिलिंडर नाही; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT