मुंबई

क्षयरोगाच्या लढाईत नवीन जलद तपासण्यांमुळे निदानात गती

CD

क्षयरोगाच्या लढाईत नवीन जलद तपासण्यांमुळे निदानात गती
वेळेवर उपचार आणि जागरूकतेवर तज्ज्ञांचा भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : भारतामध्ये क्षयरोग निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू असतानाच औषध-प्रतिरोधक क्षयरोग (डीआर-टीबी) ही नवी मोठी आव्हाने निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२५ च्या अहवालानुसार, जगातील एकूण क्षयरोग रुग्णांपैकी सुमारे २५ टक्के रुग्ण भारतात आढळतात, तर औषध-प्रतिरोधक टीबीच्या सुमारे ३२ टक्के प्रकरणांचा भारही भारतावर आहे.
संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. गुनिशा पसरिचा यांच्या मते, टीबी हा प्राचीन आजार असला तरी आजही तो मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यातच औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या डीआर-टीबीच्या वाढत्या घटनांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, टीबी हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. तो केवळ फुप्फुसांपुरता मर्यादित नसून मूत्रपिंड, मेंदू, पाठीचा कणा आदी अवयवांनाही बाधित करू शकतो. दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, ताप, वजन घटणे, रात्री घाम येणे ही त्याची प्रमुख लक्षणे असून, अनेकदा रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे निदान उशिरा होते आणि उपचार कठीण होतात.

चुकीच्या उपचारांमुळे धोका
तज्ज्ञांच्या मते, अपूर्ण किंवा चुकीच्या उपचारांमुळे टीबीचे जीवाणू औषधांना प्रतिकार करायला शिकतात आणि त्यामुळे डीआर-टीबी उद्भवतो. त्यामुळे रुग्णांनी उपचार नियमित आणि पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान, भारतात अलीकडील काळात क्षयरोगाच्या निदानासाठी आधुनिक आण्विक चाचण्या आणि नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : इस्रायलमध्ये संशयित इराणी 'क्लस्टर बॉम्ब' हल्ल्यात बालवाडीचे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT