मुंबई

आयआयटी मुंबईत ‘डीप-टेक प्री-समिट’ सुरू

CD

आयआयटी मुंबईत ‘डीप-टेक प्री-समिट’ सुरू

मुंबई, ता. २१ ः आयआयटी मुंबईतील संकुलात आज भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिटचे उद्‍घाटन भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. अजय कुमार सूद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा दोनदिवसीय कार्यक्रम आहे.
प्रा. अजय कुमार सूद यांनी आपल्या भाषणात भारताच्या तंत्रज्ञान नेतृत्वासाठी आणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी डीप-टेक नवोन्मेषाचे महत्त्व सांगितले. त्यांनी शालेय संस्थांचा, संशोधन परिस्थितिकी तंत्रांचा आणि स्टार्टअप्सचा उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात योगदानावर जोर दिला. डॉ. विनीत जोशी यांनी आपल्या भाषणात भारत इनोव्हेट्स २०२६ योजनेला एक संपूर्ण सरकार उपक्रम म्हणून त्याचे महत्त्व विशद केले. डॉ. के. राधाकृष्णन यांनी उपस्थित इनोव्हेटर्स आणि संस्थापकांना आत्मविश्वासाने कार्य करण्याचे आवाहन केले. प्रा. अभय करंदीकर यांनी भारताच्या नवोन्मेष प्रवासावर विस्तृत दृष्टिकोन मांडला आणि भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात केल्या जात असलेल्या निर्णायक धोरणात्मक पावलांची माहिती दिली. प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले, की या वेळी ३,०००पेक्षा जास्त स्टार्टअप्सच्या अर्जातून १३७ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

Pune Parvati Crime : पर्वतीतील नऊ वर्षीय मुलीवरीरील अत्याचारप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

Pune Crime : नातीसोबत बसलेलो, शेजारच्या महिलेनं अफवा पसरवली; पर्वती प्रकरणातील आजोबाचं कोर्टात उत्तर, ३ दिवस पोलीस कोठडी

Theur Crime : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

SCROLL FOR NEXT