मुंबई

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण प्रमुख आरोपी गोलू पंडित गजाआड

CD

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील
प्रमुख आरोपी गोलू पंडित गजाआड

मुंबई, ता. २१ : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रदीप शर्मा ऊर्फ गोलू पंडित याला मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश एसटीएसच्या सहकार्याने शनिवारी महावीरनगर येथून अटक केली.
आरोपी शर्मा यास मुंबईत आणल्यावर न्यायालयात हजर केले जाईल, असे गुन्हे शाखेचे उपआयुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत शर्मासह १४ आरोपींना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दीपक शर्मा आणि त्याच्यासोबत मुंबईत येऊन रेकी करणाऱ्या आरोपींना प्रदीप ऊर्फ गोलूने तयार केले होते. कुख्यात लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार शुभम लोणकर याची समाजमाध्यमांवरील पोस्ट इत्यादी पाहून गोलू प्रभावित झाला होता. परिसरात आपलीही दहशत असावी, यासाठी तो या गुन्ह्याच्या कटात सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

SCROLL FOR NEXT