मुंबई

जागतिक जल दिन''

CD

जागतिक जलदिन
-----
पुढील १५ वर्षांत आणखी
तीन हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईची लोकसंख्या एक कोटी ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे. भविष्यात आणखी वाढतच जाणार असून, २०४१ पर्यंत मुंबईची एक कोटी ७२ लाखांच्या घरात पोहोचेल, असे जाणकार सांगतात. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणी वाढ होणार असून, ६, ५३५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. गारगाई, समुद्राचे खारे पाणी गोडे करणे, असे पाणी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण केले जात असले, तरी ते किती यशस्वी होतील, याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात पाणीप्रश्न पेटणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. उद्या २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जाणार आहे.

पुढील १५ वर्षांत दोन हजार ८९१ दशलक्ष लिटर आणखी पाण्याची गरज भासणार आहे. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. मनोरी येथील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. हे सगळे प्रकल्प पुढील तीन ते चार वर्षांत पूर्ण होतील, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या मुंबईची लोकसंख्या एक कोटी ४० लाखांच्या घरात आहे. हीच लोकसंख्या २०४१ मध्ये एक कोटी ७२ लाख असेल, असा आकडा पालिकेच्या जल विभागाने अंदाजित केला आहे. २०४१ च्या आकडेवारीनुसार पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई (४४० दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी), पिंजाळ (८६५ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी) व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प (१,५८६ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी) हे नवीन स्रोत विकसित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी २,८९१ दशलक्ष लिटर्स इतकी वाढ होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

वातावरणीय बदलामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडते किंवा अपेक्षाच्या तुलनेत कमी बरसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, भारतासारख्या प्रगतिशील देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दरवर्षी पाणी बाणीची स्थिती उद्भवते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी नियोजन पद्धतीने स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होतो. मात्र, भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार याचे संकेत मिळत असताना ही मुंबईकर पाणी वाया घालवण्यात धन्यता मानतात. मुंबईला सद्यःस्थितीत दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून, २७ टक्के पाणी चोरी व गळतीमुळे वाया जाते. यासाठी २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, मुंबईत पाण्याची नासाडी पाहता मुंबईकरांना ‘पाणी हे अनमोल’ जल हैं तो जीवन हैं, पाण्याशिवाय मनुष्य, प्राणी, झाडे जगू शकत नाहीत, याचा विसर पडला असावा, अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT