मुंबई

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

CD

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांचे वयाच्या ७४व्या वर्षी लीलावती रुग्णालयात शनिवारी (ता. २१) निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

अलका केरकर या सलग तीन वेळा मुंबई महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्या वांद्रे पश्चिम येथील वॉर्ड क्र. ९८ मधून भाजपच्या नगरसेविका होत्या. केरकर यांनी २०१४-१५ दरम्यान उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळली. तसेच २०२६च्या सुरुवातीला झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर त्या महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या आघाडीच्या उमेदवारांपैकी एक होत्या. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत वांद्रे पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ९८मधून महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला. केरकर या सामान्यांशी जोडलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जात. त्यांनी नागरी सुधारणा, आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर सक्रियपणे काम केले. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संबंध होता. त्या निवृत्त शिक्षिका होत्या. ‘साधी राहणी, गेली तीस वर्षे वांद्रे पश्चिममधील जनतेची सेवा आणि भाजपचे काम मोठ्या संघर्षाने आम्ही केले. त्या संघर्षकाळातील एक महत्त्वाचा शिलेदारच मी आज गमावला आहे,’ अशी भावना मंत्री आशीष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT