वांद्रे येथील ऐतिहासिक उद्यानाचा कायापालट होणार
महापालिकेकडून ५.२८ कोटींची निविदा; पुनर्विकासासाठी उद्यान कक्षाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पश्चिम उपनगरातील वांद्रे (पश्चिम) येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ‘रावसाहेब पटवर्धन’ उद्यानाच्या प्रस्तावित विकासासाठी मुंबई महापालिकेने पाऊल उचलले आहे. उद्यानाच्या आधुनिकीकरणासाठी आणि नागरी सुविधांच्या विस्तारासाठी पालिकेच्या उद्यान आधारभूत संरचना कक्षाने पाच कोटी २८ लाख रुपयांच्या ई-निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रकल्पामुळे वांद्रे परिसरातील रहिवाशांना एक सुसज्ज आणि निसर्गरम्य विरंगुळा केंद्र मिळणार आहे.
वांद्रे (पश्चिम) येथील ३२ व्या रोडवरील भूखंडावर असलेल्या रावसाहेब पटवर्धन उद्यानाचा विकास करण्याचा पालिकेचा मानस आहे. या विकास आराखड्यात उद्यानाचे सौंदर्यीकरण, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी नवीन बाके, विद्युत रोषणाई आणि आधुनिक खेळण्यांचा समावेश असणार आहे. या कामाची अंदाजित किंमत ५,२८,०१,५२० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
पटवर्धन उद्यान हे वांद्रे येथील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. या उद्यानाचा पुनर्विकास व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. पालिकेच्या या निर्णयामुळे आता प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दादर येथील हॉकर्स प्लाझा कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण केले जाणार आहे.
निविदा प्रक्रियेचे वेळापत्रक
निविदा विक्री आणि उपलब्धता १९ मार्च २०२६ पासून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक कंत्राटदारांना ३० मार्चला दुपारी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन निविदा सादर करता येणार आहेत. तांत्रिक पडताळणीसाठी १ एप्रिल रोजी लिफाफा ए आणि २ एप्रिलला लिफाफा बी उघडला जाईल, तर आर्थिक बोलीचा लिफाफा सी १३ एप्रिलला उघडला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.