मुंबई

‘टाटा’च्या वितरण सेवेला ‘ए प्लस’ श्रेणी

CD

‘टाटा’च्या वितरण सेवेला ‘ए प्लस’ श्रेणी

मुंबई, ता. २२ : टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रीब्युशनला ‘ग्राहक सेवा रेटिंग ऑफ डिस्कॉम्स’ (सीएसआरडी) अहवालात देशातील सर्वोच्च ‘ए प्लस’ श्रेणी प्राप्त झाली आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने मिळालेल्या गुणांच्या आधारावर कंपनीने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबाबतची घोषणा ऊर्जा मंत्रालयाने नवी दिल्ली येथे केली आहे. मुंबईतील सुमारे आठ लाख ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रीब्युशनने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या सीएसआरडी अहवालात ९७.१ असा उत्कृष्ट गुणांक मिळवला. या कामगिरीच्या जोरावर कंपनीने देशभरातील ६६ वीज वितरण कंपन्यांमध्ये तसेच सर्व शहरी डिस्कॉम्समध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. सीएसआरडी अहवाल हा देशातील वीज वितरण कंपन्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणारा महत्त्वाचा राष्ट्रीय निकष आहे. या अहवालात सेवा गुणवत्ता, विश्वासार्हता, तक्रार निवारण, बिलिंग कार्यक्षमता, डिजिटल माध्यमांचा वापर आणि ग्राहक सहभाग यांसारख्या विविध बाबींच्या आधारे कंपन्यांचे मूल्यमापन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

Pune Crime: जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी महिला चोरांच्या टोळीचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं!

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

SCROLL FOR NEXT