मुंबई

कंत्राटी वीज कामगार आक्रमक; एप्रिलमध्ये कामगार आयुक्त कार्याल्यावर धडकणार

CD

कंत्राटी वीज कामगार आक्रमक; एप्रिलमध्ये कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे तुटपुंज्या वेतनावर काम करत असून, त्यांना रोजगाराची कोणतीही सुरक्षा नाही. त्यामुळे ते सातत्याने कंत्राटदारांच्या दबावाखाली काम करावे लागत असल्याने ते आक्रमक झाले असून, कंत्राटी कामगारांना कायम करावे, राज्यात कंत्राटी कामगार पद्धत कायम स्वरूपात बंद करत कंत्राटदार-विरहित वयाच्या ६० वर्षापर्यंत रोजगारात सुरक्षेसाठी हरियाना पॅटर्नचा प्रस्ताव मंत्रिमंडळास समोर तातडीने आणण्यासाठी व अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी १६ एप्रिल रोजी कंत्राटी कामगार वांद्रे पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात कंत्राटी कामगारांसाठी निकराचा लढा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे यांनी स्पष्ट केले आहे. कंत्राटी कामगारांना नियमित करावे या मागणीबरोबरच वीज उद्योगास स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी. किमान वेतन नव्हे, तर जीवन वेतन द्यावे अशा मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

मीनाकुमारी मृत्यूच्या दारात असताना कुणीही केली नव्हती मदत; चाहत्याने भरलेलं हॉस्पिटलचं बिल

Shabbir Ahmed Ansari Passes Away: ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन; मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेकडून शोक व्यक्त!

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

SCROLL FOR NEXT