गेल इंडियाला पवन ऊर्जेची भुरळ
मुंबई, ता. २२ : गॅस क्षेत्रात कार्यरत असलेल्या गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडला (गेल) स्वच्छ आणि सुरक्षित अशी ओळख असलेल्या पवन ऊर्जेची भुरळ पडली आहे. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रात पुरेशी हरित ऊर्जा उपलब्ध व्हावी, म्हणून तब्बल १,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून १७८ मेगावॉट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात कोळसा जळावा लागत असल्याने प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौर, पवन ऊर्जानिर्मितीला केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच हरित वीज प्रकल्पातून वीज खरेदी करणे वीज वितरण कंपन्यांना बंधनकारक केले आहे. त्याचाच भाग म्हणून गेल इंडियाकडून महाराष्ट्रात १७८ मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीत पवन ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.