मुंबई

१५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

CD

१५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ
मध्य रेल्वेवरील ३४ स्थानकांवरील फलाटांचा विस्तार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५ डब्यांच्या लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कल्याण, कसारा आणि खोपोली या मार्गांवरील एकूण ३४ स्थानकांवरील ५० हून अधिक फलाटांची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत सात स्थानकांवरील काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत.

रेल्वे स्थानकांवर पीक अवर्समध्ये उसळणाऱ्या गर्दीचा ओघ कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश रेल्वे मंडळाने दिले होते. त्यानुसार मध्य रेल्वेने फलांटाच्या विस्ताराचा हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील काही स्थानकांची जबाबदारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे (एमआरव्हीसी) देण्यात आली असून काही कामे मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे आहेत. उर्वरित स्थानकांवरील कामे मुंबई विभागामार्फत केली जात आहेत. यामध्ये कल्याण-कर्जत मुख्य मार्गावरील वांगणी, शेलू आणि भिवपुरी या स्थानकांवर फलाट विस्ताराचे काम सुरू आहे. तर कर्जत-खोपोली उपमार्गावरील पळसदरी, केळवली, डोलवली, लोवजी आणि खोपोली या स्थानकांवरही काम प्रगतिपथावर आहे. तसेच कसारा मार्गावरील शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, उंबरमाळी आणि कसारा येथील फलाटांचा विस्तार करण्यात येत आहे. सध्या सीएसएमटी येथे फक्त फलाट क्रमांक सातवरच १५ डब्यांची लोकल उभी करता येते. फलाट क्रमांक पाच आणि सहाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे १५ डब्यांचा रेक उभा करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवासी क्षमतेत वाढ
सध्या १५ डब्यांच्या लोकल फक्त जलद मार्गावरच चालवता येतात. कारण सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या दहा स्थानकांवरच पुरेशा लांबीचे फलाट उपलब्ध आहेत. यामध्ये विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत, खोपोली, वासिंद आणि आटगाव या सात स्थानकांवरील फलाट विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रवासी वाहतूक क्षमतेत सुमारे २५ टक्के वाढ होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

गर्दी कमी होण्यास मदत
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आणखी २० स्थानकांवरील कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर सीएसएमटी, ठाणे, डोंबिवली, दिवा, कल्याण, वांगणी आणि खडवली या महत्त्वाच्या सात स्थानकांवरील कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. १२ डब्यांच्या लोकलमधून सुमारे ३,५०४ प्रवासी प्रवास करतात. १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रवासी वाहतूक क्षमतेत सुमारे २५ टक्के वाढ होऊन यामधून सुमारे ४,३८० प्रवासी प्रवास करू शकतात. परिणामी, फेऱ्या वाढल्यास गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT