मुंबई

‘ओव्हरहेड’च्या खांबावर तरुणाचा थरार

CD

‘ओव्हरहेड’च्या खांबावर तरुणाचा थरार
कल्याणमध्ये रेल्वे वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : कल्याण रेल्वे स्थानकावर एका अज्ञात तरुणाने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून गोंधळ घातल्याची घटना रविवारी (ता. २२) दुपारी २च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मध्य रेल्वेला संबंधित मार्गावरील वीजपुरवठा तातडीने खंडित करावा लागला. परिणामी काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळित झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक एक, एक-अ आणि दोनला वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला होता. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघात टाळण्यासाठी ठाकुर्ली ते आंबिवली यादरम्यानचा डाऊन मार्गावरील वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे दोन लांब पल्ल्याच्या गाड्या आणि तीन लोकल गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या. बचावकार्य सुरू असताना संबंधित तरुणाने मोबाईल फोनची मागणी केली. त्याला फोन देण्यात आला; मात्र त्याने तो खिशात ठेवून काही वेळाने खाली फेकून दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, सुमारे दोन तास सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर वंदे भारत एक्स्प्रेस येताच अनेक प्रवासी हा प्रकार पाहण्यासाठी जमा झाले होते. पोलिसांनी गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. बचावकार्यादरम्यान संबंधित तरुणाला विद्युत प्रवाहाचा धक्का बसून तो खाली कोसळला व जखमी झाला. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि आपत्कालीन पथकांनी त्याला तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील शीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
...
पोलिसांकडून तपास सुरू
तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, आत्महत्येचा प्रयत्न होता की मानसिक अस्थिरतेतून हा प्रकार घडला, याबाबत कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT