पायाच्या समस्येसंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन
प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईत ‘फूट आणि अँकल परिषद’ २०२६ ही यशस्वीरीत्या पार पडली. मूनोट हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. पाय आणि घोट्याच्या समस्यांवरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी देश-विदेशातील ऑर्थोपेडिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट आणि आरोग्य अधिकारी यात सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे यंदा दोन परिषद एकाच वेळी घेण्यात आल्या. डॉक्टरांसाठी मुंबई फूट अँड अँकल परिषदेचे हे दुसरे वर्ष होते, तर फिजिओथेरपिस्टसाठी पहिल्यांदाच रिहॅबिलिटेशन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पहिल्यांदाच कॅडेव्हेरिक कार्यशाळा घेण्यात आली, ज्यामध्ये शरीररचनेवर प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाला २५० हून अधिक प्रतिनिधी आणि ५० नामवंत वक्ते उपस्थित होते. यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, मतप्रवर्तक आणि भारतीय क्रिकेट संघासह प्रमुख क्रीडा संस्थांमधील फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश होता.
या अत्याधुनिक कार्यशाळेत मिनिमली इनवेसिव्ह शस्त्रक्रियेची मूलभूत आणि प्रगत तंत्रे तसेच प्रगत आघात व्यवस्थापनावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. प्रदीप मुनोट म्हणाले, की शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट या दोघांसाठी एक शैक्षणिक व्यासपीठ तयार करणे आणि पाय व घोट्याच्या काळजीसाठी बहुशाखीय दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे, हा या परिषदेच्या आयोजनाचा उद्देश होता.
या ठिकाणी मृतदेहासंबंधित कार्यशाळा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम होता. यामुळे फिजिओथेरपिस्टना शस्त्रक्रियेतील शरीररचना आणि तंत्रांची अधिक जवळून माहिती मिळवण्याची एक दुर्मिळ संधी मिळाली. याशिवाय कॉफी टेबल बुकचे प्रकाशनदेखील पार पडले. परिषदेच्या इतर प्रमुख आकर्षणांमध्ये एका व्यापक वैज्ञानिक कार्यक्रमाचा समावेश होता. यामध्ये तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील व्याख्याने, पॅनेल चर्चा आणि संबंधित विषयावर आधारित विचारविनिमयाचा समावेश होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी पाय व घोट्याच्या शस्त्रक्रियेतील नवीनतम प्रगती, नावीन्यपूर्ण उपचार पद्धती, क्रीडा दुखापतींचे व्यवस्थापन, विकृतींमधील सुधारणा आणि पुनर्वसन प्रोटोकॉल यावर आपले अनुभव एकमेकांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.