मुंबई

मुंबईत ‘टीबीमुक्त’ मोहिमेला बळ

CD

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : देशाची आर्थिक राजधानी मुंबईला क्षयरोग (टीबी) नियंत्रण मोहिमेला यश येत आहे. २०२५ मध्ये शहरातील एकूण टीबी रुग्णसंख्येत ९ टक्क्यांनी घट झाली असून, सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या ड्रग-रेझिस्टंट (डीआर) टीबी रुग्णांमध्ये तब्बल १९ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यामुळे ‘टीबीमुक्त मुंबई’ या उद्दिष्टाच्या दिशेने मोठी पावले उचलली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये डीआर-टीबीचे ५०४७ रुग्ण होते. २०२५ मध्ये घटून त्यांची संख्या ४,८० वर आली होती. त्यामुळे एकूण टीबी रुग्णसंख्या ५३,६३८ वरून ४८,८३५ पर्यंत कमी झाली आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे दोन लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. या सर्वांनंतरही रुग्णसंख्येत घट झाल्याने तपासणी आणि उपचार प्रणाली प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘हॉटस्पॉट’ मुंबईत मोठे यश
मुंबईसारख्या घनदाट लोकसंख्येच्या शहरात टीबी नियंत्रण करणे मोठे आव्हान मानले जाते. येथे संसर्ग जलद गतीने पसरण्याचा धोका अधिक असतो. मात्र पालिकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही घट पुढील पाच वर्षे कायम राहिली तर मुंबई खऱ्या अर्थाने ‘टीबीमुक्त’ शहर होऊ शकते.

लवकर निदान आणि सुधारित उपचारांचा परिणाम
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, अत्याधुनिक तपासणी तंत्रज्ञान (सीबी-नेट व नवीन मशीन्स) वापरून लवकर निदान वेळेवर उपचार सुरू केल्याने संसर्गाचा प्रसार कमी सामान्य टीबीचे एमडीआरमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण घटले. यामुळे केवळ नवीन रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर संसर्गाची साखळीही तुटू लागली आहे.

विशेष रुग्णांसाठी खास योजना
पालिकेने ‘डिफरेंशिएटेड टीबी केअर’ अंतर्गत उच्च-जोखीम रुग्णांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. यामध्ये: मधुमेह, किडनी, लिव्हर, ॲनिमिया असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष वैयक्तिक गरजेनुसार उपचार योजना अधिक प्रभावी आणि यशस्वी उपचार परिणाम होतात. पालिकेने १९,१७२ रुग्णांची काळजी घेतली आहे.

मुंबईत टीबी रुग्णसंख्येत झालेली घट ही योग्य धोरण, आधुनिक तंत्रज्ञान आणि वेळेवर उपचार यांचा मिळून आलेला परिणाम आहे. हीच गती कायम राहिल्यास ‘टीबीमुक्त मुंबई’चे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते.
- डाॅ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT