मुलुंडमध्ये भररस्त्यात
तीन तरुणांवर हल्ला
दोन जण गंभीर जखमी; गुन्हा दाखल
मुंबई, ता. २३ : मुलुंड येथे तीन तरुणांवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुलतान मलिक आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
मुलुंड पोलिसांनी नोंद केलेल्या प्रथम खबरी अहवालानुसार (एफआयआर) दोन रविवारी संध्याकाळी दोन स्वतंत्र घटनांत मलिकने सोहेल खान, मंथन खातू आणि पलविंदर संधू या तिघांवर हल्ला केला. पहिला हल्ला सोहेल याच्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास मुलुंडच्या मॉडेला टाऊन परिसरात झाला. त्याला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. त्याने हे मंथनला सांगितले. मंथन आणि संधू हे दोघे जखमी सोहेलच्या मदतीसाठी धाव घेतली. ते मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयाकडे जात असताना मलिक आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यात अडवून दोघांवर चाकूचे वार केले.
जखमी मंथन, संधू यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांनाही मलिक आणि त्याच्या साथीदारांनी धमकावले. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने, कार्यालये बंद केली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी मलिक याच्यासह जय खरात, महिपाल, सिद्धेश शिंदे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवून धरपकड सुरू केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.