शिवडीतील क्षय रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईतील क्षयरोगाविरुद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबई महापालिकेने शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय समूह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान असलेली लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबमध्ये झीन एक्स्पर्ट, एलपीए, कल्चर, डीएसपी तपासण्या केल्या जातात. सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णांना अधिक चांगली सेवा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
या रुग्णालयात केवळ औषधोपचारांपुरती मर्यादा न ठेवता रुग्णांची सर्वांगीण काळजी घेण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज इमारत आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणे यामुळे निदान व उपचार प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक झाली आहे. रुग्णालयात २४ तास कार्यरत अतिदक्षता विभाग, तसेच बाह्य रुग्ण विभाग उपलब्ध असून, गंभीर रुग्णांनाही तातडीने उपचार मिळू शकतात. विशेष म्हणजे, येथे रुग्णांना मोफत उपचारासह तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन दिले जाते. तसेच क्षयरोगामुळे शरीराची होणारी झीज लक्षात घेऊन रुग्णांना दररोज सकस व पौष्टिक आहार देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे मुंबईतील क्षयरोग नियंत्रण मोहिमेला अधिक बळ मिळणार असून, रुग्णांच्या पुनर्वसनालाही मदत होणार आहे.
...
विविध सुविधा
- १,००० खाटांची क्षमता
- डीआर आणि डीएस रुग्णांसाठी वेगवेगळे वॉर्ड
- सरासरी ५०० रुग्णांवर रोज उपचार
- लवकर निदानासाठी मोफत थुंकी तपासणी, एक्स रे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.