मुंबई, ता. २५ : पूर्व उपनगरात चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेला तब्बल २.२१ कोटींचा मुद्देमाल अतिरिक्त आयुक्त महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना परत केला. चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी हिसकावलेले मंगळसूत्र आणि विविध कंपन्यांच्या तब्बल ८०० मोबाईल फोन तक्रारदारांना परत करण्यात आले. या सर्वांत चोरी झालेले मंगळसूत्र परत गळ्यात घालताना तक्रारदार महिलेला आनंदाश्रू अनावर झाले, तर आस सोडून दिलेल्या अनेकांना मोबाईल परत मिळाल्याने सुखद धक्का बसला.
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयाशेजारील खासगी सभागृहात मंगळवारी (ता. २४) संध्याकाळी हा कार्यक्रम झाला. त्यात अतिरिक्त आयुक्त पाटील, उपआयुक्त समीर शेख, चेंबूर, गोवंडी, नेहरूनगर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, आरसीएफ, मानखुर्द, देवनार, शिवाजीनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि विभागीय सहाय्यक आयुक्त हजर होते.
परिमंडळ सहाअंतर्गत मोडणाऱ्या या सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बहुभाषिक लोकसंख्या आहे. येथील बहुतांश नागरिक बैठ्या चाळी आणि दाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. त्यामुळे या पोलिस ठाण्यांमध्ये हत्या, मारहाण आदी शारीरिक गुन्ह्यांसोबत चोरीचे सर्वाधिक गुन्हे नोंद होतात. पाटील आणि शेख यांनी मागील काही महिन्यात घडलेली चोरी, सोनसाखळी, मोबाईल चोरीचे गुन्हे तपासावर घेतले. प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथक तयार करून चोरी झालेली मालमत्ता हस्तगत करण्याचे लक्ष्य पथकांसमोर ठेवण्यात आले. या पथकांनी मुंबई, महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये तपास करून २.२१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आणि तो नागरिकांना परत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.