मुंबई

तिसऱ्या मुंबईचा आराखडा चार टप्प्यात

CD

तिसऱ्या मुंबईचा आराखडा चार टप्प्यांत
‘एमएमआरडीए’ घेणार सिंगापूरच्या एजन्सीची मदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : रायगड जिल्ह्यात कर्नाळा- साई- चिरनेरपट्ट्यात (केएससी टाऊन) साकारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईचा आराखडा (मास्टर प्लॅन) चार टप्प्यांत तयार केला जाणार आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ प्रशासन सिंगापूरच्या सरबना जुरोंग या एजन्सीची मदत घेणार आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईची आखणी नियोजनानुसार केली जाणार आहे.

मुंबई, नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या या तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील १२३ गावांच्या तब्बल ३२३ चौरस किलोमीटर क्षेत्रात हे नियोजित शहर उभारले जाणार असून त्यासाठी एमएमआरडीएने नुकत्याच जाहीर झालेल्या आपल्या अर्थसंकल्पात तब्बल ४,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या तिसऱ्या मुंबईची पायाभरणी होणार असल्याचे निश्चित झाले असून त्याबाबतचा मास्टर प्लॅन आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार आहे. त्याकरिता सिंगापूरच्या सरबना जुरोंग या एजन्सीची मदत घेतली जाणार असल्याचे ‘एमएमआरडीए’चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

चार टप्प्यांत आराखडा
तिसऱ्या मुंबईचा आराखडा मुख्य चार भागांमध्ये राबवला जाईल. पहिल्या भागात उपलब्ध जमिनीची व्याप्ती आणि सध्या सुरू असलेली कामे, त्याचे क्षेत्र नकाशावर दाखवले जाईल. दुसऱ्या भागात पाण्याचे स्रोत, वनस्पती आणि आसपासचे पर्यावरणीय घटक यांसारखी नैसर्गिक वैशिष्ट्ये लक्षात घेत त्या अनुषंगाने नियोजन होईल. तिसऱ्या भागात जमिनीच्या किमतीचा अंदाज बांधला जाईल, तर चौथ्या भागात जमिनीचे वर्गीकरण करून त्याचे संपादन आणि प्रत्यक्ष आराखडा याचे नियोजन असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT