मुंबई

‘सीडीओई’चा वर्धापन दिन उत्साहात

CD

विद्यार्थीकेंद्री उपक्रमातून शिक्षण सुलभ
‘सीडीओई’चा वर्धापनदिन उत्साहात साजरा

मुंबई, ता. २५ : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राने (सीडीओई) ५६ वर्षांच्या समृद्ध वाटचालीत लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. समाजातील विविध घटकांना सक्षम करण्याचे कार्य केले आहे. डिजिटल तंत्रज्ञान, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण अधिक सुलभ करण्यात आले. ‘सीडीओई’चा प्रवास हा प्रवेशापासून परिवर्तनाकडे होत असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
‘सीडीओई’च्या ५६व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, ‘सीडीओई’चे संचालक प्रा. शिवाजी सरगर, उपसंचालक डॉ. पूजा मोरे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे आदी या वेळी उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. कुलकर्णी यांनी ‘सीडीओई’च्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. हे केवळ शिक्षणाचे माध्यम नसून, समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची संधी देणारे परिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. या माध्यमातून ज्ञानाची दारे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा विद्यापीठाचा दृढ संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना एकाच वेळी विविध शाखांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची बहुआयामी क्षमता विकसित होऊन ते अधिक स्पर्धात्मक व रोजगारक्षम बनतील. याच पार्श्वभूमीवर मागील शैक्षणिक वर्षापासून ‘सीडीओई’मध्ये दुहेरी पदवीचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
----
गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे नवी दिशा
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. राजनीश कामत यांनी आपल्या भाषणात सीडीओईचा ‘प्रवेशापासून परिवर्तनाकडे’ होत असलेला प्रवास अधोरेखित केला. ‘सीडीओई’ने सर्वांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या संधींना नवे पंख मिळाले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे त्यांना नवी दिशा मिळत आहे, असे त्यांनी नमूद केले. बदलत्या काळात तंत्रज्ञानाची कास धरणे अत्यावश्यक असून, अभ्यासक्रमांना कौशल्यांची जोड दिल्यास विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

SCROLL FOR NEXT