मुंबई

मॉरिशसमधील महाराष्ट्र भवन विस्तारित वास्तूची पायाभरणी

CD

मॉरिशसमधील महाराष्ट्र भवन विस्तारित वास्तूची पायाभरणी

मुंबई, ता. २५ : मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा नुकताच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवन वास्तूच्या विस्तारासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या वास्तूतील सभागृहाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव देण्यास स्थानिक समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन्ही प्रदेशांमधील मैत्रीचे नाते पिढ्यानपिढ्यांचे असून सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे,’ असे गौरवोद्गार चव्हाण यांनी या वेळी काढले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मॉरिशसच्या दोनदिवसीय दौऱ्यात उच्चस्तरीय मान्यवरांच्या भेटीगाठी घेत भारत-मॉरिशस संबंध अधिक दृढ केले. या दौऱ्यात चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीत भारत-मॉरिशस मैत्री, सागरी अर्थव्यवस्था, पर्यटन, एआय आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मॉरिशस हा भारताचा लहान भाऊ आहे, असे सांगत राष्ट्राध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

SCROLL FOR NEXT