मुंबई

मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा ‘पाया’ भक्कम

CD

मुंबई महापालिका शाळांतील
विद्यार्थ्यांचा ‘पाया’ भक्कम

‘एफएलएन’चा प्रशासनाकडून आढावा; चाैथीपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २५ : महापालिका शिक्षण विभागाच्या ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (एफएलएन) उपक्रमामुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते चाैथीच्या सुमारे एक लाख २० हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज (ता. २५) भायखळा येथील पेंग्विन सभागृहात विशेष बैठक झाली. या यशस्वी प्रयोगाची व्याप्ती वाढवून तो संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्याबाबत या वेळी सकारात्मक चर्चा झाली.

​भारताच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत २०२७पर्यंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता विकसित करण्याचे ध्येय आहे. मुंबई महापालिकेने जानेवारी २०२५पासून सुरू केलेल्या या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

​शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी या उपक्रमाला पुरोगामी पाऊल संबोधले, तर अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर भर दिला. ‘शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. लहान वयात होणारे संस्कार आणि भक्कम पाया विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात,’ असे डॉ. ढाकणे यांनी नमूद केले.

उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या अक्षर ओळखीवर, वाचनक्षमतेवर आणि संख्याज्ञानावर विशेष लक्ष दिले जात आहे. जानेवारी २०२५मध्ये अडखळत वाचणारी मुले चांगल्याप्रकारे वाचन करू लागली आहेत. या उपक्रमात मुक्तांगण एज्युकेशन ट्रस्ट, अदाणी फाउंडेशन आणि स्टरलाइट एअर इंडिया फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांच्या उंचावणाऱ्या प्रगती आलेखाची सविस्तर माहिती दिली.
........
सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल म्हणाले, की ‘मुंबईत विविध भाषा बोलणारी मुले पालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांत शिकतात. अशा वैविध्यपूर्ण वातावरणात एफएलएन उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. केवळ एका वर्षात हे ध्येय साध्य होणार नाही, तर त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT