मुंबई

खासगी विमा कंपनीत ३७ लाखांची अफरातफर

CD

खासगी विमा कंपनीत ३७ लाखांची अफरातफर
कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा; ग्राहकांची रक्कम स्वतःकडे घेत बोगस पावत्या दिल्याचा आरोप
मुंबई, ता. २६ : खासगी विमा कंपनीत ३७ लाखांचा अपहार करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याविरोधात मंगळवारी विक्रोळीच्या पार्क साईट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. मोहित शहा असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो रिलेशनशिप मॅनेजर या पदावर नियुक्त होता. त्याने विम्यासाठी ग्राहकांनी भरलेली रोख रक्कम कंपनीत न भरता स्वतःकडे घेतली आणि ग्राहकांना बोगस पावत्या दिल्याचा आरोप आहे.
सप्टेंबर २०२४मध्ये एका ग्राहकाने केलेल्या तक्रारीमुळे या गैरव्यवहाराला वाचा फुटली. संजय गुप्ता नावाच्या ग्राहकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने एक वर्षाची विमा योजना घेतली होती. २०२४मध्ये त्याने या योजनेची मुदत पुढील एक वर्षासाठी वाढवून घेतली. त्याने शहाकडे आधीच्या वर्षाच्या परताव्याची मागणी केली, तेव्हा शहाने स्वतःच्या बँक खात्यावरून गुप्ता यांच्या खात्यावर सात हजार रुपये जमा केले.
परतावा वैयक्तिक खात्यातून कसा दिला, या गुप्ता यांच्या प्रश्नावर शहा निरुत्तर झाला. संशय बळावल्याने त्यांनी शहाची वरिष्ठांकडे तक्रार दिली. त्याआधारे केलेल्या अंतर्गत चौकशी, पडताळणीत शहाने गेल्या काही वर्षांत अनेक ग्राहकांनी विमा योजनेसाठी दिलेली एकूण ३७ लाखांची रोख रक्कम कंपनीत न भरता स्वतःकडे घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यास कामावरून कमी केले गेले.
गैरव्यवहार स्पष्ट होताच कंपनीने सर्व ग्राहकांच्या खात्यांवर नेमकी रक्कम व्याजासह जमा केली. या रकमेची परतफेड करेन, असे आश्वासन शहाने मेलद्वारे दिले होते. मात्र परतफेड न झाल्याने कंपनीने त्याच्याविरोधात तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT