मुंबई

मुंबईत उन्हाचा चटका वाढला

CD

मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला
कमाल तापमान ३३ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २६ : मार्च महिना संपत असतानाच मुंबईत उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. मुंबईचे कमाल तापमान गुरुवारी ३३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
दिवसाचे कमाल तापमान ३३ अंश असले तरी हवेतील ५१ टक्के आर्द्रतेमुळे प्रत्यक्षात ३७ ते ३८ अंशांसारखा उकाडा जाणवत आहे. प्रामुख्याने दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होता. वायव्य दिशेकडून वाहणाऱ्या १६ मैल प्रतितास वेगाच्या वाऱ्यांमुळे काहीसा दिलासा मिळत असला, तरी उष्म्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आज मुंबईत अतिनील किरणांचा निर्देशांक १० या उच्चांकावर पोहोचला आहे. त्यामुळे त्वचेचे विकार आणि उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे. बाहेर पडताना छत्री, टोपी आणि सुती कपड्यांचा वापर करावा, तसेच जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. मुंबईत पावसाची शक्यता नाही. येत्या २४ तासांत आकाश निरभ्र राहील. किमान तापमान २७ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज असून रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT