मुंबई

विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

CD

विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

मुंबई, ता. २६ ः कांदिवलीच्या न्यू लिंक रोडवर बुधवारी (ता. २५) संध्याकाळी घडलेल्या विचित्र अपघातात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. टुवनकुमार यादव (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.
चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू लिंक रोडवर आफताब आलम या व्यक्तीने वाहतुकीस अडथळा होईल, अशा पद्धतीने आपली कार उभी केली होती. तसेच त्याने मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न घेताच उजवीकडील (चालकाजवळील) दार उघडले. त्याच सुमारास यादव आपल्या इलेक्ट्रिक स्कूटीवरून प्रवास करीत होता. अचानक उघडलेल्या कारचा दरवाजा त्याला लागला आणि तो धडपडला. तो रस्त्यावर पडला आणि मागून भरधाव आलेल्या टँकरने त्याला चिरडले. त्यात गंभीर जखमी झालेल्या यादवचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आफताबसह टँकरचालक अनंतराय यादवविरोधात गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT