मुंबई

आयआरसीटीसीला १० लाखांचा दंड

CD

आयआरसीटीसीला १० लाखांचा दंड
‘वंदे भारत’प्रकरणी रेल्वेची कारवाई; करार रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : वंदे भारत एक्स्प्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून संबंधित अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीवर ५० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच या कंपनीचा करार रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२६ला पटना- टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. रेल्वेकडून सांगण्यात आले, की प्रवाशांची सुरक्षितता आणि दर्जेदार सेवा देणे ही भारतीय रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ठरवून दिलेल्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई केली जाते. दरम्यान, भारतीय रेल्वे आयआरसीटीसीच्या माध्यमातून दररोज सुमारे १५ लाखांहून अधिक प्रवाशांना जेवणाची सेवा पुरवते. जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेतील अन्नपुरवठा व्यवस्थांपैकी ही एक व्यवस्था मानली जाते. त्यामुळे अन्नाचा दर्जा आणि प्रवाशांची सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
...
काय होते प्रकरण?
१५ मार्च २०२६ला पटना- टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दिलेल्या जेवणातील दह्याच्या कपामध्ये जिवंत अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संबंधित प्रवाशाने या प्रकाराचा व्हिडिओ काढून रेल्वेकडे तक्रार दाखल केली. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीत अन्नाच्या गुणवत्तेबाबत निष्काळजी झाल्याचे समोर आल्यानंतर आयआरसीटीसीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीवर मोठा दंड ठोठावत तिचा करारही रद्द करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT