मुंबई

किनारपट्टीवर प्रदूषणाचा विळखा

CD

किनारपट्टीला प्रदूषणाचा विळखा
सांडपाणी रोखण्याची मागणी; सभागृहात नगरसेवकांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : सांडपाणी समुद्रात सोडल्याने समुद्राचे पाणी दूषित होत असून, समुद्रातील जीवांना धोका निर्माण झाला आहे. सांडपाणी समुद्रात जाऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपायोजना हाती घेऊन समुद्रात जाणारे सांडपाणी व कचरा रोखून मासे आणि अन्य जलचर प्राण्यांना जीवदान द्यावे, अशी मागणी मंगळवारी (ता. २४) महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी समुद्रात सोडण्यात येते. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या समुद्राचे पाणी दूषित झाले असून, जलचर प्राणी, वनस्पती, जीवसृष्टी यांना धोका निर्माण झाल्याने पालिका अधिनियम ६६ ब अन्वये चिंतामणी निवाटे यांनी महापालिका सभागृहात प्रस्ताव मांडला. या वेळी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली.
शिवसेना ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांनी आपण महापौर असताना नेव्ही अधिकाऱ्यांसोबत समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली असता, समुद्रकिनाऱ्यालगतचे पाणी वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसून आले. आजही तीच परिस्थिती आहे. दूषित पाण्यामुळे किनाऱ्यालगतची मासेमारी बंद करायची वेळ कोळी बांधवांवर आली आहे. त्यामुळे मासेमारीच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या छोट्या कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात शिंपले मिळत होते. पण आता या शिंपल्यांचे प्रमाण कमी झाल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणले.
समुद्रामध्ये सांडपाण्याच्या वाहिन्या थेट सोडण्यात आल्यामुळे घाण पाणी समुद्रात पसरत आहे. समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे समुद्रकिनारा दिवसेंदिवस अस्वच्छ होत आहे. पावसाळ्यात मोठी भरती असताना हजारो टन कचरा समुद्राच्या पाण्याबरोबर बाहेर फेकला जातो. किनाऱ्यालगतच्या कोळी बांधवांच्या घरात पाण्यासोबत हा कचरा शिरतो. त्यामुळे पावसाळ्याचे दिवस कोळी बांधवांसाठी त्रासदायक असतात. समुद्राच्या किनाऱ्यालगत फेकला जाणारा कचरा लक्षात घेता, समुद्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व कचरा जात असल्याचे स्पष्ट होते. किनाऱ्यालगतची मासेमारी बंद झाल्यामुळे अनेकांना व्यवसायासाठी काढलेले कर्जही भरता येत नाही, असे मत भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी सांगितले.

महापालिकेचे म्‍हणणे काय?
सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी समुद्रात सोडले जाते. परंतु २०२७ पर्यंत भांडुप, वर्सोवा, वांद्रे, वरळी, धारावी, घाटकोपर येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे सुरू होणार आहेत. या प्रक्रिया केंद्रांत सांडपाण्यावर द्वितीय दर्जाची प्रक्रिया करून ते पाणी समुद्रात सोडले जाईल. त्यामुळे समुद्रलगतचे पाणी दूषित होणार नसल्याचे या वेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT