मुंबई

गिरणी कामगारांना एक लाख घरे

CD

गिरणी कामगारांना एक लाख घरे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २६ : मुंबईच्या वैभवात मोलाचे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. मुंबई आणि लगतच्या परिसरात गिरणी कामगारांसाठी लवकरच एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी गृहनिर्माण सचिव असीम गुप्ता आणि म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच कामगार नेते, संबंधित मंत्री आणि सचिवांसोबत या विषयावर सविस्तर बैठक घेतली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार आता प्रत्यक्ष कामाला गती दिली जाणार आहे. कामगारांना मुंबईतच हक्काचे घर मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी नवीन सूत्र मांडले आहे. ​जेथे २,००० घरांचे प्रकल्प आहेत, तेथे ५०० अतिरिक्त घरे गिरणी कामगारांसाठी बांधली जातील. ​३,००० घरांच्या प्रकल्पात ७५० अधिकची घरे उपलब्ध करून दिली जातील. बंद गिरण्यांच्या जागा, क्लस्टर विकास आणि एसआरए प्रकल्पांमध्येही कामगारांसाठी स्वतंत्र आरक्षण ठेवले जाईल. कामगारांच्या हिताचा विचार करून सरकारने सक्तीच्या अटी काढून टाकल्या आहेत. ज्या कामगारांना मुंबईबाहेर किंवा दूरच्या ठिकाणी घरे हवी आहेत, ते तेथे घरे घेऊ शकतात; मात्र त्यांच्यावर कोणतीही सक्ती नसेल. कामगारांचा घराचा हक्क कायम राखत जाचक अटी दूर केल्याने कामगारवर्गात आनंदाचे वातावरण आहे. ‘ज्या गिरणी कामगारांच्या जीवावर मुंबई उभी आहे, त्यांना हक्काचे घर मिळालेच पाहिजे, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आम्ही पाळत आहोत,’ अशी आठवणही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी करून दिली.
...
निर्णयाचे स्वागत
आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली १६ कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीने १० मार्चला आझाद मैदानावर अभूतपूर्व आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याची भावना सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे. लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांच्यासह सर्व कामगार नेत्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT