मुंबई

‘डेक्कन क्वीन’चा आज रेल्वे महोत्सव

CD

‘डेक्कन क्वीन’चा
आज रेल्वे महोत्सव

सीएसएमटी स्थानकात विशेष कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मध्य रेल्वेच्या प्रतिष्ठित डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा रेल्वे महोत्सव शुक्रवारी (ता. २७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक गाडीच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गाडी सुटण्याच्या एक तास आधी सायंकाळी ५.१० वाजता या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या वेळी ‘डेक्कन क्वीन’ फुलांनी सजवण्यात येणार असून तिच्या इतिहासावर आधारित दृकश्राव्य सादरीकरणही होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाडीचे ऐतिहासिक स्वरूप जपत तिचे नूतनीकरण करण्यात आले आहे. १ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन ही मुंबई- पुणेदरम्यान धावणारी देशातील पहिली डिलक्स आणि सुपरफास्ट गाडी म्हणून ओळखली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Beed Crime : बीडमध्ये खळबळ! माजी सभापतीच्या मुलाने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार; 'या' कारणामुळे घाबरली होती महिला

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

SCROLL FOR NEXT