मुंबई

राम नामाच्या जयघोषात रामनवमीचा उत्साह मंदिरांमध्ये उत्साह, मुंबईकरांची अलोट गर्दी

CD

राम नामाच्या जयघोषात रामनवमीचा उत्साह
मंदिरांमध्ये उत्साह, मुंबईकरांची अलोट गर्दी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई , ता. २६: भोईवाडा श्री राम मंदिर येथे १५० वर्षे जुने पारंपरिक श्री राम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या या मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाची सुरुवात सकाळी कलावती आई यांच्या भजनाने झाली. त्यानंतर दुपारी आंब्रे गुरुजींचे कीर्तन झाले. मंदिराचे विश्वस्त विरेंद्र केशरीनाथ ठाकूर आणि . विनिता ठाकूर यांच्या हस्ते रामजन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारच्या सत्रात डॉ. अजित पवार आणि त्यांच्या वडिलांनी भजन सादर केले.
दरम्यान, परळ विभागातील साईबाबांची पालखी मंदिरात दाखल झाली. ही पालखी भोईवाडा परिसरात फिरून पुन्हा मंदिरात परतली या मंदिरात पालखी हातात घेऊन नाचवण्याची पारंपरिक पद्धत आजही जपली जात आहे.
यंदा मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या राम मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली. रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांकडून सुरू असलेल्या राम नामाच्या जयघोषाने मुंबई नगरी दुमदुमून निघाली. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेले पालखी सोहळे व मंदिर परिसरात लावलेल्या भगव्या झेंड्यांमुळे निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणात भाविकांनी रामाचे दर्शन घेतले.
वडाळा येथील राम मंदिरात सकाळी रामाची प्रार्थना करुन  रामनवमीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर रथ वास्तू हवन करण्यात आले. यासह, वडाळ्यातील राम मंदिरात १५,००० भाविकांना महाप्रसाद देण्यात आला
..........................................
जागोजागी भक्तिमय वातावरण-
माटुंगा पश्चिम येथील पिंपळेश्वर दत्त मंदिरात राम नवमी चा उत्सव साजरा केला जातो. सकाळी १० वाजता आशिर्वाद महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, पूजा व आरती, संध्याकाळी श्रद्धा महिला मंडळांचे भजन, स्वामिनी ग्रुप चा भावगीतांचा कार्यक्रम आणि त्यानंतर तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
........................................
स्वामींच्या मठात ही गर्दी-
राम नवमीनिमित्त स्वामींच्या मठात ही भक्तांनी मोठी गर्दी केली होती. परेल वर्कशॉप, परळ एसटी स्टॉप जवळील स्वामी मठात दर्शनाची खूप मोठी रांग पाहायला मिळाली. सकाळपासून राम नवमी निमित्त जप, भजन, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT