मोकळ्या हवेशीर जागेमुळे मुंबईजवळ सेकंड होमची वाढ
मुंबई, ता. २८ : गर्दीच्या शहरात राहण्यापेक्षा स्वच्छ हवा, मोकळी जागा आणि शांत परिसर यांना प्राधान्य मिळत असल्यामुळे मुंबईच्या बाहेर व जवळच्या परिसरात दुसऱ्या घराची (सेकंड होम) मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
वाहतूक कोंडी आणि प्रदूषणापासून दूर पण तरीही महामार्ग, विमानतळ यांच्याशी जोडलेल्या अशा परिसरांना आता अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे खोपोली आणि कर्जत ही ठिकाणे लक्झरी व्हिला आणि प्लॉटेड डेव्हलपमेंटसाठी नवीन आकर्षण बनत आहेत. त्यामुळे येथे अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी मोठे प्रकल्प सुरू केले आहेत. पाच कोटी रुपयांपर्यंतच्या या व्हिलांना उच्च माध्यमवर्गीय आणि श्रीमंत व्यक्तींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अलिबाग तसेच गोव्यासारख्या ठिकाणीही श्रीमंत गुंतवणूकदार सेकंड होममध्ये गुंतवणूक करीत आहेत. ही घरे सुट्टीच्या दिवसांपुरती मर्यादित नसून, अनेक जण या ठिकाणी जास्त दिवस राहतात आणि वर्क फ्रॉम होमसाठीही अशा घरांचा वापर होतो, असे नियोलीव्हचे संस्थापक व सीईओ मोहित मल्होत्रा म्हणाले. लोणावळ्यापेक्षा खोपोलीत मालमत्तेच्या किमती ३० ते ४० टक्के कमी असूनही तेथे परवडणाऱ्या लक्झरी घरांना मागणी आहे. ही मागणी अशीच वाढत राहिली तर २०३० पर्यंत खोपोलीमधील मालमत्तेच्या किमतीही वाढतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.