मुंबई

मध्य रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

CD

मध्य रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. २९) मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी, नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर या सेवा पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीवदरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून या सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

ट्रान्स हार्बर
कुठे : ठाणे ते वाशी, नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी, नेरूळ, पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी, नेरूळ, पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT