मुंबई

मध्य रेल्वेविरोधात मनसे आक्रमक!

CD

मध्य रेल्वेविरोधात मनसे आक्रमक!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मध्य रेल्वेच्या अंतर्गत पदोन्नती परीक्षेत मराठी भाषेला स्थान न दिल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी संबंधित अधिसूचनेत तत्काळ बदल करून मराठीचा समावेश करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेने गुरुवारी (ता. २६) यासंदर्भातील निर्णय रद्द केल्याचे परिपत्रक काढल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वेने १६ मार्च २०२६ला काढलेल्या ‘जीडीसीई ०१/२०२६’ या अधिसूचनेनुसार संगणकाधारित परीक्षेचे माध्यम केवळ हिंदी आणि इंग्रजी ठेवण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. यापूर्वी २०१७, २०१९ आणि २०२३ पर्यंत या परीक्षा मराठी भाषेतही घेतल्या जात होत्या. त्यामुळे या वेळी मराठीला का वगळण्यात आले, असा सवाल मनसेने उपस्थित केला. विभागीय पदोन्नतीच्या परीक्षांमध्येही मराठी भाषेचा समावेश करावा, अशी भूमिकाही मनसेने मांडली आहे. ऑगस्ट २०२५मध्ये रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत भरती परीक्षा १५ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे हा निर्णय स्थानिक पातळीवर का राबवला गेला नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, मनसेने दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीचा मुद्दाही लावून धरला आहे. ही गाडी दिवा स्थानकावरून सुरू करण्यात आल्यामुळे मुंबई व कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ही गाडी पुन्हा दादर स्थानकावरून सुरू करावी अन्यथा १५ ते २० दिवसांत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT