मुंबई

अपहरण-खंडणीप्रकरणी दोन पोलिसांना अटक

CD

अपहरण-खंडणीप्रकरणी दोन पोलिसांना अटक
१० हजार अमेरिकन डॉलर लुटले

मुंबई, ता. २७ ः कंपनीतर्फे परकीय चलन जुहू येथे पोहोच करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याच्याजवळील तब्बल १० हजार अमेरिकन डॉलर लुटल्याच्या आरोपात दोन पोलिस शिपायांना अटक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
जुहू पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. गुन्ह्यात सहभागी अन्य आरोपींची अटक आणि परकीय चलन हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. संदीप शिंदे (वय ३३) आणि गजेंद्र राजपूत अशी अटक आरोपी पोलिसांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत धाडले आहे. बुधवारी दुपारी जुहू सर्कल ते दहिसर यादरम्यान ही अपहरण नाट्य घडल्याचे तपासाची संबंधित पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
वांद्रे येथील परकीय चलनविषयक व्यवहार करणाऱ्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याकडे १० हजार अमेरिकन डॉलर देऊन जुहू परिसरातील कंपनी कार्यालयात पोहोच करण्यास सांगितले. हा कर्मचारी जुहू सर्कल येथे आला तेव्हा आधीपासून दबा धरून बसलेल्या पाच आरोपींनी त्याला अडवले आणि जबरदस्ती आपल्या कारमध्ये बसवले. ही कार जुहू येथून दहिसरपर्यंत येईपर्यंत अपहरणकर्त्या आरोपींनी या कर्मचाऱ्यास जबर मारहाण केली. त्याच्याकडील परकीय चलन असलेली बॅग हिसकावून घेतली. दहिसर परिसरात या कर्मचाऱ्याने धीर राखून आरडाओरडा केला, वाचवण्याची विनंती केली. त्याच्या हालचाली एका प्रवाशाने पाहून बंदोबस्तावरील पोलिसांना कळवले. पोलिसांनी पाठलाग करून ही कार अडवली. तेव्हा अन्य आरोपी पसार झाले; मात्र एक आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. पुढे त्याची ओळख वांद्रे कुर्ला संकुल पोलिस ठाण्यात नियुक्त शिपाई शिंदे अशी पटली. प्रथम त्यास दहिसर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर प्रकरण जुहू पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. अपहरण, खंडणीचा गुन्हा नोंदवून शिंदे यास अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून जोगेश्वरी पोलिस ठाण्यात नियुक्त राजपूत याचा सहभाग स्पष्ट झाल्याने त्यास ठाणे येथील निवासस्थानाहून अटक करण्यात आली.
...
तपास सुरू
या गुन्ह्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे तपासासंबंधित अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या आरोपींनी याआधी अशा प्रकारचे अन्य गुन्हे केले असावेत, असा संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे त्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT