मुंबई

प्रतीक्षा नगरचा होणार पुनर्विकास

CD

प्रतीक्षानगरचा होणार पुनर्विकास
प्रस्ताव देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; सहकार भवनाचे भूमिपूजन

मुंबई, ता. २७ : अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरचाही पुनर्विकास प्रस्ताव तयार करावा, प्रतीक्षानगर येथे म्हाडाच्या माध्यमातून उत्तम अशा प्रकारची घरे रहिवाशांना कशी देऊ आणि त्यांचेही चांगल्या घरात राहण्याचे स्वप्न कसे पूर्ण करू, याबाबतचा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे म्हाडाच्या उपाध्यक्षांना दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २७) प्रतीक्षानगर येथे मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून उभे राहणाऱ्या राज्यातील सर्वात मोठ्या सहकार भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुंबई हाउसिंग फेडरेशन संचालित विक्रोळी येथील सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचेही उद्‍घाटन झाले. या वेळी प्रवीण दरेकर यांनी अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरचाही पुनर्विकास करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी म्हाडा उपाध्यक्षांना दिले. या वेळी फडणवीस म्हणाले, की मुंबईत सहकार भवन असावे, ही संकल्पना प्रवीण दरेकर यांनी मांडली व सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. सहकाराच्या क्षेत्रात ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या सर्व गोष्टी या सहकार भवनात मिळतील. राज्यात सहकाराने विशेषतः ग्रामीण भाग, शेती, शेतीपूरक उद्योग यात अतिशय उत्तम काम केले आहे. त्याच वेळी सहकारातून गृहनिर्माणाचे क्षेत्र दुर्लक्षित होते, दरेकर यांच्या पाठपुराव्याने मागील काळात सहकारात बदल केला व गृहनिर्माण संस्थांचा वेगळा भाग सहकार कायद्यात समाविष्ट केला. गृहनिर्माण संस्थांसाठी ज्या ज्या तरतुदींची आवश्यकता होती त्या सर्व तरतुदी केल्या. डीम्ड कन्व्हेन्समार्फत सोसायट्यांना त्यांच्या जमिनीचे मालक करण्याचा निर्णयही केला. दरेकर यांच्या पाठपुराव्याने स्वयंपुनर्विकास हा अत्यंत चांगला मुद्दा हातात घेतला आहे. मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकासाच्या क्षेत्रात मुंबईतील मराठी माणसाला त्याचे हक्काचे घर मिळण्याकरिता जे योगदान दिले ते अत्यंत महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात मुंबई बँक चांगले काम करते. लाडक्या बहिणींसाठी राज्यात पहिली योजना मुंबई बँकेने तयार केली. त्याचबरोबर विक्रमी वेळेत या सहकार भवनाची वास्तू पूर्ण करावी. त्याच्या उद्‍घाटनालाही आम्ही येऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या वेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पंकज भोयर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, राहुल शेवाळे, अमित साटम, आमदार तमिल सेल्वन, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडा मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे मुख्य अधिकारी महेंद्र कल्याणकर, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गृहनिर्माण व्यवस्थापन पुस्तिकेचेही अनावरण करण्यात आले.

प्रतीक्षानगरमध्ये जवळपास ८८ इमारती तसेच संक्रमण शिबिरे आहेत. सहा हजार २०० भाडेकरू येथे राहतात. या इमारतींना ३० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असल्याने काही इमारती धोकादायकही होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

राज्यातील सहकार चळवळीला दिशा देणारे हे सहकार भवन ठरेल. मुंबई जिल्हा बँक, सहकारी फेडरेशनच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम फडणवीस यांनी सातत्याने केले आहे. स्वयंपुनर्विकासाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सहकार चळवळीला ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे. अर्बन बँका आज अडचणीत आहेत. २०० कोटी देण्याचा प्रस्ताव अनास्कर समितीने दिला आहे. अजून जिल्हा बँका प्रतीक्षेत आहेत. बेरोजगारी सहकारी संस्था, महिला संस्थांना शासकीय काम द्यावे. राज्यातील सहकाराला ताकद देण्यासाठी जे जे लागेल ते मुख्यमंत्र्यांकडून करून घेऊ.
- प्रवीण दरेकर, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT