मुंबई

चिमुकल्याच्या कानातले दातांनी उचकटणारे चोरटे गजाआड

CD

चिमुकल्याच्या कानातले दातांनी उचकटणारे चोरटे गजाआड
मुंबई, ता. २८ ः अपहरण करून चिमुकल्याच्या कानातले सोन्याचे डूल दातांनी उचकटून पसार झालेल्या दोन तरुणांना विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींनी अमानुषपणे डूल उचकटल्याने चिमुकला रक्तबंबाळ अवस्थेत पालकांना सापडला. विक्रोळीच्या टागोरनगर परिसरात मंगळवारी ही अमानुष घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टागोरनगर परिसरात राहणारा चार वर्षांचा मुलगा गोळ्या-बिस्कीट आणण्यासाठी वस्तीतल्या जवळच्या दुकानात गेला. बराच वेळ तो घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. दुकानावरही तो न आढळल्याने पालक घाबरले. चोहीकडे शोध सुरू असताना मुलगा स्वतःच घराच्या दिशेने चालत येताना आढळला. मात्र त्याच्या दोन्ही कानांच्या पाळ्यांमधून रक्त वाहत होते. कान टोचले तेव्हा घातलेले सोन्याचे डूलही गायब होते. ते पाहून पालकांनी तडक विक्रोळी पोलिस ठाणे गाठले.
दिवसाढवळ्या घडलेला अमानुष गुन्हा गंभीरतेने घेत वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी आणि पथकाने प्रथम लहान मुलाला विश्वासात घेत आवश्यक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. त्यात दोन्ही आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसल्याने त्यांची ओळख पटवून अवघ्या काही तासांत त्यांना अटक करण्यात आली.
मोहम्मद बशीर ऊर्फ उबेद सलीम शेख (२५) आणि अरबाज जाहिदअली पठाण ऊर्फ अल्लू (२४) अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT