मुंबई

थकीत कर भरण्यासाठी उरले शेवटचे तीन दिवस

CD

थकीत कर भरण्यासाठी उरले शेवटचे तीन दिवस
३१ मार्चपूर्वी भरणा करा; सुट्टीच्या दिवशीही पालिकेची कार्यालये सुरू

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २८ ः आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मालमत्ता कर संकलनासाठी आपली कंबर कसली आहे. ज्या नागरिकांनी अद्याप आपला मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांच्यासाठी पालिकेने विशेष सूचना जारी केल्या असून थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
​​महापालिकेच्या महसुलाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर दंडात्मक कारवाई किंवा कायदेशीर पावले उचलली जाऊ शकतात. त्यामुळे शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी नागरिकांनी त्वरित कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
​मार्चअखेरची गर्दी आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन पालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर संकलनासाठी नियुक्त केलेली पालिकेची विशेष केंद्रे आणि नागरिक सुविधा केंद्रे (सीएफसी) या शनिवार (ता. २८) आणि रविवारी (ता. २९)देखील सुरू राहणार आहेत. सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन आपला कर भरता येणार आहे.

पालिकेचे मुंंबईकरांना आवाहन
नागरिक पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही घरबसल्या ऑनलाइन कर भरू शकतात. शहराच्या विकासकामांत सहकार्य करण्यासाठी आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी सर्व मालमत्ताधारकांनी मुदतीपूर्वी आपला कर जमा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT