मुंबई

वाचनाची गोडी वाढवा, पुस्तकाला मित्र बनवा

CD

वाचनाची गोडी वाढवा, पुस्तकाला मित्र बनवा
मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव उद्‌घाटन समारंभात मान्यवरांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा देणारे प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. पुस्तकांशी मैत्री केल्यास कधीच एकटे वाटत नाही. वाचनाची सवय आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आणि यशाच्या मार्गावर पुढे नेणारी असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वांनीच वाचनात गोडी वाढवून पुस्तकाला मित्र बनवावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात मान्यवरांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे दोन दिवशीय मुंबई शहर ग्रंथोत्सव-२०२५चे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथोत्सवाचे उद्‌घाटन लेखक, चित्रकार व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्ष सुचिता मोरे, बृहन्मुंबई दक्षिण विभाग कार्यालयाच्या शिक्षण निरीक्षक डॉ. वैशाली वीर, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष शीतल करदेकर, उमा नाबर यांच्यासह साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून, ती मनाला समृद्ध करणारी आणि विचारांना नवी दिशा देणारा एक ऊर्जास्रोत असल्याने लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, असे आवाहन लेखक प्रकाश बाळ जोशी यांनी केले.

प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले, की राज्यात ११ हजारांवर शासन मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत होत आहे. राज्य शासनामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव आयोजित करून वाचन संस्कृतीला अधिक बळ दिले जात आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथे आयोजित ग्रंथोत्सवातील ग्रंथदालनांचा लाभ नागरिक व वाचकांनी घ्यावा.
विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाइमिंगपासून थोडे बाजूला होऊन पुस्तकांना मित्र बनवावे, असे शिक्षण निरीक्षक डॉ. वैशाली वीर यांनी या वेळी म्हणाल्या. तर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी राज्य शासनाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयास पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी ग्रंथोत्सवातील दोन दिवसांत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती प्रास्तविकात दिली. ग्रंथोत्सव हा वाचन संस्कृतीचा उत्सव असून, दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सव व पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन एक तरी पुस्तक खरेदी करून वाचक, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी ग्रंथोत्सवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीमध्ये ज्ञानेश्वर विद्यालय, दिगंबर पाटकर विद्यालय, राजा शिवाजी विद्यालय, सोशल सर्व्हिस लीग विद्यालय, आर. एम. भट हायस्कूल, शिशुविहार माध्यमिक विद्यालय, गुरू नानक विद्यालय, बंगाली एज्युकेशन स्कूल, बालमोहन विद्यामंदिर आणि कीर्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या शाळांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

मुलांचा सहभाग भारावून टाकणारा
ग्रंथालयाने वाचनाचा वारसा जतन केला आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल. सकाळी ग्रंथदिंडीमध्ये असलेला मुलांचा सहभाग, त्यांचा उत्साह मनाला भारावून टाकणारा होता, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप

SCROLL FOR NEXT