माटुंगा येथे आजपासून दोनदिवसीय कृषी प्रदर्शन
मुंबई, ता. २८ : हवामान बदल, आधुनिक सिंचन आणि सेंद्रिय शेतीपुढील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने माटुंगा येथे एका राज्यस्तरीय परिषदेचे आणि ‘सिद्धेश्वर ॲग्रोटेक’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था येथे रविवार (ता. २९) रोजी दुपारी २:३० वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. सुजित कुमार शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण, आयसीटीचे कुलपती प्रा. जे. बी. जोशी हे असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीटीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, कुलसचिव प्रा. भगवान जोगी, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचे मुख्य महाव्यवस्थापक गिरीश थॉमस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्यासह कृषी व औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसोबतच आयोजित प्रदर्शनात शेतीसाठी उपयुक्त अशा अत्याधुनिक यंत्रांचे स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये रेफ्रिजरेटेड व्हॅन, कोल्ड स्टोरेज आणि फ्रीज ड्रायर लॅमिनॉर एअरफ्लो, व्हर्टिकल ऑटोक्लेव्ह आणि इनक्युबेटर यांसारखी तांत्रिक उपकरणे, सेंद्रिय कडधान्ये, नैसर्गिक उत्पादने आणि महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थ यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.