सामाजिक दायित्वातून आरोग्य व्यवस्थेला बळ : प्रकाश आबिटकर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः राज्यातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, सर्वसमावेशक आणि शाश्वत करण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक दायित्व उपक्रमांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. आबिटकर म्हणाले, की शासनाच्या निधीसोबतच सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून अतिरिक्त संसाधने उपलब्ध झाल्यास आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होईल. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वतंत्र सामाजिक दायित्व समन्वय कक्ष स्थापन केला आहे. पायाभूत सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ, प्रशिक्षण तसेच माहिती, शिक्षण व संवाद या क्षेत्रांत सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबारसारख्या दुर्गम भागांमध्ये बोट रुग्णवाहिकेसारखे उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक दायित्वातून मोठी संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. बैठकीत स्वयंचलित बाह्य हृदय स्पंदन पुनर्संचयित करणारे यंत्र, हृदय-फुप्फुस पुनर्जीवन प्रशिक्षण, डिजिटल आरोग्य प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला.
...
सकारात्मक प्रतिसाद
उद्योग व सामाजिक संस्थांनी आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी जिल्हे दत्तक घेणे, उपकरणे उपलब्ध करून देणे, देखभाल आणि प्रशिक्षण यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. या समन्वयातून राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख होण्यास चालना मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.