मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

CD

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण
ई-गव्हर्नन्समध्ये एससीईआरटीची उल्लेखनीय झेप
मुंबई, ता. ३१ : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे रिअल टाइम विश्लेषण आणि ट्रॅकिंग करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटीची) महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सर्वोत्तम आयुक्त/संचालक गटातील ६८ सहभागींपैकी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करून एससीईआरटीला गौरविण्यात आले असून, परिषदेच्या वतीने सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे आणि उपसंचालक ज्योती शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. परिषदेचे तत्कालीन संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण व्यवस्थेत डेटाआधारित निर्णय प्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे.
एकूणच कृत्रिम बुद्धिमत्ता, जीआयएस आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून एससीईआरटीने शिक्षण क्षेत्रात आधुनिक, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. परिषदेने सुरू केलेले हे कार्य यापुढे अधिक प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास विद्यमान संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
एससीईआरटीने एआयच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचे आणि एकूण प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण प्रयोग राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करून शिक्षक व प्रशासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ झाले आहे. डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रातही परिषदेने लक्षणीय प्रगती केली असून, एकूण १५२ पैकी १३५.५ गुण मिळवत उच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-ऑफिस प्रणालीत १०० टक्के अंमलबजावणी करीत ९६.९४ टक्के फाइल्स निकाली काढण्यात आल्या आहेत. सर्व ९२ कर्मचारी ई-ऑफिसवर सक्रिय असून, कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले आहे.

तंत्रज्ञानआधारित रिअल टाइम मॉनिटरिंग
डॅशबोर्ड प्रणालीद्वारे डेटा व्हिज्युअलायझेशन आणि नियमित अपडेट्समुळे जिल्हा स्तरापर्यंत निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे. डिजिटल हजेरी आणि इतर उपक्रमांचे रिअल टाइम मॉनिटरिंगही प्रभावीपणे केले जात आहे. तसेच जीआयएस तंत्रज्ञानाच्या वापरातून राज्य ते शाळा स्तरापर्यंत हिटमॅप्सद्वारे उपस्थिती व अध्ययन कामगिरीचे विश्लेषण करण्यात येत आहे.

तक्रार निवारणाचा दर ९७ टक्के
तांत्रिकदृष्ट्या एससीईआरटीची वेबसाइट १०० टक्के सुरक्षित, प्रमाणित आणि मोबाइल सुसंगत असून, दररोज एक हजारांहून अधिक वापरकर्ते या वेबसाइटला भेट देत आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत आवश्यक माहितीचे प्रकटीकरणही पारदर्शकपणे करण्यात आले आहे. तक्रार निवारण प्रक्रियेत १० पैकी ९.७ इतका चांगला समाधान दर नोंदवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT