टपाल खात्याच्या जलद सेवांमुळे ई-कॉमर्स व शासकीय कामांना वेग
मुंबई, ता. १ : इंडिया पोस्टने महाराष्ट्रात वेळबद्ध ‘प्रीमियम’ वितरण सेवा सुरू करत ई-कॉमर्स व शासकीय कामकाजाला गती दिली आहे. या नव्या सेवांमुळे पार्सल व कागदपत्रांचे जलद आणि सुरक्षित वितरण शक्य होत असल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ई-कॉमर्स व्यावसायिक व सरकारी कार्यालयांच्या गरजा लक्षात घेऊन ‘२४ स्पीड पोस्ट’, ‘२४ स्पीड पोस्ट पार्सल’ आणि ‘४८ स्पीड पोस्ट’ या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे २४ ते ४८ तासांत पार्सल व कागदपत्रांचे वितरण सुनिश्चित केले जात आहे.
मेळाव्यात टपाल सेवा संचालिका सिमरन कौर यांनी ग्राहकांच्या अभिप्रायाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह म्हणाले, ई-कॉमर्स क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे या सेवा सुरू करण्यात आल्या असून, ग्राहकांना वेळेत सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमादरम्यान ‘२४ स्पीड पोस्ट’ सेवेचे लाइव्ह प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले, ज्यामध्ये टपाल जलद गतीने पोहोचवून दाखवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.