मुंबई

सेवानिवृत्त दाम्पत्याची २.८४ कोटींची फसवणूक

CD

सेवानिवृत्त दाम्पत्याची
२.८४ कोटींची फसवणूक
एक महिना आभासी अटकेत

मुंबई, ता. २९ ः निवृत्त शासकीय अधिकारी आणि त्यांच्या पतीस तब्बल एक महिना आभासी अटकेत ठेवत, सायबर चोरट्यांनी तब्बल २.८४ कोटी रुपये उकळले. या फसवणुकीचा तपास सायबर पोलिस (पूर्व विभाग) करीत आहेत. तक्रारदार ७७ वर्षांचे असून सेवानिवृत्त आहेत, त्यांच्या पत्नी २०११ मध्ये सहकार व पणन खात्यातून वरिष्ठ स्वीय सहाय्यक म्हणून निवृत्त झाल्या आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तक्रारदाराच्या पत्नीस अनोळखी व्यक्तीने कॉल करून मुंबई पोलिस दलातून बोलत असल्याचे भासवले. उत्तर प्रदेश एटीएसने सुमारे ९० दहशतवाद्यांना अटक केली असून त्यातील एकाने आपल्या आधार कार्डवरून बँक खाते उघडले आहे. संबंधित बँक खात्यावर ७० लाख रुपये जमा झाले असून ते दहशतवादी कृत्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे, असेही नमूद केले. ही बाब पत्नीने तक्रारदाराच्या कानी घातली. दाम्पत्यास एनआयएचे बोधचिन्ह असलेली आणि तत्कालीन प्रमुख सदानंद दाते यांचे नाव व सही असलेली कागदपत्रे व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आली. तपास पूर्ण होईपर्यंत बँक खात्यातील सर्व जमा, गुंतवणूक विविध बँक खात्यांवर पाठवण्यास सांगण्यात आले. १४ डिसेंबर ते १६ जानेवारी या कालावधीत तब्बल २.८४ कोटी रुपये जमा केले. तपास पूर्ण होताच ही रक्कम परत केली जाईल, असे सांगणाऱ्या चोरट्यांनी पुढे संपर्क तोडला. तक्रारदाराने दोन महिने या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होत नसल्याने सोमवारी (ता. २३) त्यांनी पेडर रोड येथील एनआयएचे कार्यालय गाठले. तेथे घडला प्रकार सांगताच फसवणूक झाल्याचे दाम्पत्याला समजले, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT