मुंबई

लालबागमध्ये ३ एप्रिलपासून रंगणार भक्तीचा सोहळा

CD

लालबागमध्ये ३ एप्रिलपासून रंगणार भक्तीचा सोहळा
‘न्यू सातारा समूहा’चा भव्य हरिनाम सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३० : गिरणगावातील आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपत, न्यू सातारा जिल्हा नागरिक मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी (न्यू सातारा समूह) यांच्या वतीने लालबागमध्ये भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३ एप्रिल ते गुरुवार, ९ एप्रिल या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांच्या वाणीतून भक्तीची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
​लालबाग येथील गणेश टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर हा सप्ताह पार पडणार आहे. सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणारी नामवंत कीर्तनकारांची ‘संकीर्तन सेवा’ हे असणार आहे.
३ एप्रिलला शिवचरित्रकार ह.भ.प. गुरुदेव महाराज चव्हाण (कोपरगावकर) यांच्या कीर्तनाने सुरुवात होईल. ४ एप्रिलला ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख (पंढरपूर), तर ५ एप्रिलला ह.भ.प. ॲड. चिदंबरेश्वर किसन महाराज साखरे (आळंदी) आपली सेवा देतील. ६ एप्रिलला ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर आणि ७ एप्रिलला ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे यांचे कीर्तन होणार आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धात ८ एप्रिलला ह.भ.प. गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर (वासकर फड) यांची सेवा होईल. ९ एप्रिलला ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भव्य सोहळ्याची सांगता होईल.
​गिरणगाव आणि परिसरातील सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहून श्रवण सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू सातारा समूहाच्या वतीने करण्यात आले आहे. या आयोजनामुळे लालबाग परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

Police Adhikshak Tushar Patil Death : अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वयाच्या ४५ व्या वर्षी प्राणज्योज मालवली

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

SCROLL FOR NEXT