मुंबई

सेंट जॉर्ज रुग्णालयातील लिव्हर ओपीडीला अल्प प्रतिसाद

CD

लिव्हर ओपीडीला अल्प प्रतिसाद
सेंट जॉर्ज रुग्णालयात दोन महिन्यांत फक्त ३५ रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : सरकारी रुग्णालयांमध्ये नोंदणीपासून डॉक्टरांच्या तपासणीपर्यंत लांबच लांब रांगा लागतात. मात्र, सेंट जॉर्ज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या विशेष लिव्हर (यकृत) ओपीडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
यकृत आणि इतर गंभीर यकृत आजारांनी ग्रस्त रुग्णांना एकाच ठिकाणी तज्ज्ञ उपचार मिळावेत, या उद्देशाने ही ओपीडी सुरू करण्यात आली. मुंबईतील सरकारी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची समर्पित लिव्हर ओपीडी सुरू करणारे सेंट जॉर्ज हे पहिले रुग्णालय ठरले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, ही ओपीडी दर शुक्रवारी मर्यादित वेळेत चालवली जाते. दुपारी १२ ते १ या वेळेत गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. अमित गुप्ता रुग्णांची तपासणी व सल्ला देतात. मात्र, सुरुवातीचे दोन महिने उलटूनही केवळ ३५ रुग्णांनीच या सुविधेचा लाभ घेतला आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, रुग्णांची कमतरता नसून त्यांना येथे पोहोचवणारी यंत्रणा कमकुवत आहे. इतर विभागांतून योग्य रेफरल मिळाल्यास दर आठवड्याला अनेक रुग्ण येथे येऊ शकतात. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले की, ओपीडी सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी प्रतिसाद कमी आहे. यकृताशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

इतर रुग्णालयांना पत्रव्यवहार
या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने जेजे रुग्णालय, जीटी रुग्णालय आणि कामा रुग्णालय यांना पत्र पाठवून यकृताचा त्रास असणाऱ्या रुग्णांना येथे पाठवण्याची विनंती केली आहे. तरीही अपेक्षित प्रमाणात रुग्ण येत नसल्याचे दिसते.

या आजारांवर होणार उपचार -
फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, सिरोसिस यासारखे आजार झपाट्याने वाढत आहेत. मात्र, जनजागृतीचा अभाव आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या कमतरतेमुळे रुग्ण या सुविधेपासून वंचित राहत आहेत. ओपीडीबाबत व्यापक माहिती पोहोचवली आणि रेफरल यंत्रणा मजबूत केली, तर ही सेवा लिव्हर रुग्णांसाठी मोठी मदत ठरू शकते, असे डॉक्टरांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Aadul Rain : आडूळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान

Ambad lightning : अंबड शहरासह परिसरात वादळ, वाऱ्यासह गारा; वीज पडुन दोन युवकांचा मृत्यू

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; तर उर्वरित राज्याला वादळी पावसाचा इशारा

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT