विमान आसनाच्या शुल्कात २० एप्रिलपासून बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : येत्या २० एप्रिलपासून विमानातील किमान ६० टक्के जागा अतिरिक्त शुल्काशिवाय मिळणार आहेत. विमान नियामक मंडळ डीजीसीएने हा नवीन नियम जाहीर केला आहे. यामुळे प्रवाशांना जागा निवडणे सोपे होईल आणि फसवणूक टाळता येईल.
सिव्हिल ॲव्हिएशन मंत्रालयाने १८ मार्चला घोषणा केली होती, की विमान कंपन्यांनी प्रत्येक फ्लाइटवर ६० टक्के जागा अतिरिक्त शुल्काशिवाय द्याव्यात. डीजीसीएने २० मार्चला सुधारित एअर ट्रान्सपोर्ट परिपत्रक जारी केले, जे २० एप्रिलपासून अमलात येईल. डीजीसीए अधिकाऱ्याने सांगितले, की प्रत्येक फ्लाइटमध्ये किमान ६० टक्के जागा अतिरिक्त शुल्काशिवाय देणे बंधनकारक आहे. जागावाटपाची धोरणे पारदर्शक असावीत आणि बुकिंग साइटवर या जागांची माहिती स्पष्टपणे दाखवावी. याशिवाय एकाच पीएनआरवर बुक केलेल्या प्रवाशांना शक्यतो एकत्र बसवावे. सध्या २० टक्के जागा अतिरिक्त शुल्काशिवाय मिळतात. बाकीच्यांसाठी २०० ते २,१०० रुपये शुल्क आकारले जाते. डीजीसीएने इतर सूचनाही दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.