मुंबई

‘मेलडी रोड’ बंद केलेला नाही

CD

‘मेलडी रोड’ बंद केलेला नाही

महापालिकेचे स्पष्टीकरण; रात्री केवळ बॅरिकेडिंग

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३० : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पावरील ‘संगीतमय मार्ग’ (मेलडी रोड) कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याच्या चर्चांना महापालिका प्रशासनाने पूर्णविराम दिला आहे. हा मार्ग बंद केलेला नसून, स्थानिक रहिवाशांच्या सुविधेसाठी केवळ रात्री या ५०० मीटरच्या पट्ट्यात बॅरिकेडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

​किनारी रस्ता प्रकल्पाच्या उत्तर वाहिनी मार्गिकेवर बोगद्याबाहेर पडणाऱ्या ५०० मीटर लांबीच्या रस्त्यावर ‘मेलडी रोड’ विकसित करण्यात आला आहे. वाहन चालवताना विशिष्ट वेगाने गेल्यास संगीतमय धून ऐकू यावी, या उद्देशाने हा अभिनव प्रयोग करण्यात आला होता. या मार्गावरून वाहने धावताना निर्माण होणाऱ्या आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार काही स्थानिक रहिवाशांनी केली होती.

संगीतमय मार्ग कायमचा बंद करण्यात आलेला नाही. रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिकेने या ठिकाणच्या आवाजाची पडताळणी केली असता निर्माण होणारा ध्वनी हा निर्धारित डेसिबल मर्यादेतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही रात्री शांततेच्या वेळी रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, या तांत्रिक कारणास्तव रात्री ठरावीक भागापुरते बॅरिकेडिंग केले जाणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT